prabodhini news logo
Home कारंजा अडत असोसिएशनच्या अध्यक्षपदी मनोज पाटील कानकिरड नव्याने कार्यकारिणीचे झाले गठन.

अडत असोसिएशनच्या अध्यक्षपदी मनोज पाटील कानकिरड नव्याने कार्यकारिणीचे झाले गठन.

0
143

शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – कारंजा (लाड) : दि.२८.१०.२०२५ मंगळवार रोजी अडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष वसंतराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेऊन नविन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी मनोज पा.कानकीरड,उपाध्यक्ष दत्तात्रय पा.तुरक, उपाध्यक्ष वसंत पवार, सचिव नागोराव चौधरी, कोषाध्यक्ष राजु पाटील ढोकने, सदस्य शिवराज अनिल खोरगडे, सदस्य किशोर बालचंदजी जाधव याप्रमाणे नवनिर्वाचित कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. या सभेसाठी निर्मलजी बरडीया,ईश्वर पा. ताठे,गुलारावजी ढेरे,सुधिरजी काठोये,राजु पा.लुंगे, विलासराव नेमाने,राजु जी अटल, सुरेशजी सोनोने,बाळु पा गावडे, बाळासाहेब पाकधने,संजयजी ठाकरे,ऋषभजी गोलेच्छा,गोविंद जी तोतला,सुभाषजी साबु,सुभाषजी भावनगरे,अनिलजी पांडे राहुलजी ठाकरे,सचिनजी विभुते,वहीदभाई शेख बाबा पापडे, प्रमोदजी मिसाळ इत्यादी बाजार समिती मधील अडते उपस्थित होते.सर्वांनी नविन अध्यक्ष व कार्यकारिणीचे जल्लोषात अभिनंदन केले. असे वृत्त मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here