prabodhini news logo
Home कारंजा मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे यांचे कारंजा नगरीत जल्लोषात स्वागत.

मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे यांचे कारंजा नगरीत जल्लोषात स्वागत.

0
126

शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – कारंजा : दिव्यांगाचे कैवारी- शेतकरी नेते बच्चु कडू यांच्या शेतकरी आंदोलनाला नागपूर येथे भेट देवून आंदोलना बाबत सविस्तर चर्चा करून, नागपूर येथून आंतरवाली सराटी येथे परत जात असताना मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी कारंजा शहराजवळून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर, कारंजा येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे यांचे उत्साहाने दणदणीत स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजय काकडे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुर्वे, प्रमोद गायकवाड, पत्रकार विजय गागरे,नितीन काळे आदींनी त्यांचा पुष्पहार घालून सत्कार केला व आरक्षण आणि समाज बांधवांच्या अन्य प्रश्नासंबंधी सविस्तर चर्चा केली. व मनोज पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है । अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी दीपक काळे, विशाल दबडे, निलेश गायकवाड,अशोक शेंडे,चंदू खराडे,सचिन जाधव, श्रीकांत जाधव,  सुरेश गिरमकार,अक्षय जगताप, संजय कडोळे,प्रदिप वानखडे, रामेश्वर खराडे, अचिकेत जाधव, मनोज जाधव, रवि साटोटे , मोरे यांच्यासह इतर उपस्थित होते. असे वृत्त मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here