prabodhini news logo
Home चंद्रपूर दिवंगत मंदाताई के. पाटील यांचे स्मृती प्रित्यर्थ स्मृतिगंध सोहळा संपन्न

दिवंगत मंदाताई के. पाटील यांचे स्मृती प्रित्यर्थ स्मृतिगंध सोहळा संपन्न

0
158

वर्धा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – वर्धा ऑडीओट्रानिक साऊंड अँड लाईट प्रतिष्ठान तर्फे आयोजित सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त दिवंगत मंदाताई के . पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्मृतिगंध सोहळ्याचे आयोजन दिनांक 10 नोव्हेंबर 2025 ला स्थळ विक्रमशिला नगर, सिंधी मेघे वर्धा येथे त्यांच्या निवासस्थानी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत परित्रण पाठ घेण्यात आला त्यानंतर परिसंवाद सकाळी 12 ते 3 वाजेपर्यंत विषय आंबेडकरी चळवळीतील महिलांचे योगदान या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक भूषण रामटेके आंबेडकरी विचारवंत, प्रमुख अतिथी माननीय नानाजी सुनतकरी अध्यक्ष विक्रमशीला चारिटेबल ट्रस्ट, विशेष अतिथी डॉक्टर प्राध्यापक विद्या राईकवार आंबेडकरी विचारवंत हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यानंतर सत्कार समारंभ दुपारी 3ते 5 वाजेपर्यंत रमाई गौरव पुरस्कार आंबेडकरी चळवळीचे महागायक माननीय प्रकाशनाथ पाटणकर यांच्या शुभ हस्ते देण्यात आले.

यावेळी पुरस्कार स्वीकारताना सर्वश्री डॉक्टर राजेंद्र भस्मे मुंबई, सोनू कांबळे, विजय दाभाडे, धनंजय नाखले, संगम कासारे मुंबई, परमानंद भारती नागपूर, ऋतिक नगराळे, भिमेश भारती, माया सोमकुवर नागपूर, सुषमा देवी मुंबई, मधु बावलकर आदिलाबाद, डॉक्टर रमेशचंद्र येसनकर, चंद्रकांत झुंजार पुणे, अरविंद खैरकर, निरज गुजर, सुरेश गवळी मुंबई, दयानंद इंगोले अकोला डॉक्टर सुशील सूर्यवंशी जालना, राहुल थूल गुरुजी नागपूर, अनिरुद्ध शेवाळे नागपूर, प्रशांत डोंगरदिवे चिखली, राजू जीवतोडे, सतीश कांबळे हिंगणघाट, महेंद्र मडामे रायपूर, नितीन गजभिये, माननीय राकेश धारगावे, प्रशांत दारुंडे, भगवान गावंडे आकोट, उषा बनसोडे मुंबई, ऍड क्रांतिभूषण खडसे अमरावती, डॉक्टर प्रज्ञा इंगळे, साधना मेश्राम पुणे, मनोज राजा गोसावी, रिता खंडारे अकोला यांना रमाई गौरव पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर गीत प्रबोधन सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत महाराष्ट्राच्या खतना गायक गायिकाचा भीम बुद्ध गीतांचा संगीतमय कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व संगीत नियोजन माननीय एडवोकेट नागसेन मानकर नागपूर, या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन कवी. के. पाटील अध्यक्ष प्रबोधनकार कला साहित्य वर्धा,तसेच सेलवी, श्राव्या, कोकोरो, यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here