prabodhini news logo
Home ठळक बातम्या समीर कॉम्प्युटर येथे एमएससीआयटी २५ वा स्थापणा दिवस साजरा

समीर कॉम्प्युटर येथे एमएससीआयटी २५ वा स्थापणा दिवस साजरा

0
99

जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674

(भंडारा ) – महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड महामंडळ मर्यादित शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे जाळे एमएससीआयटी व क्लिक कोर्सेसेस घेऊन डिजिटल सक्षमीकरणाचा संदेश सर्व नागरिकांना पोहचविण्यासाठी समीर वर्ल्ड कॉम्प्युटर सातत्याने प्रयत्न करत आहे. तसेच विद्यार्थ्यांवर विविध संस्कार होण्यासाठी एकसे बढकर एक उपक्रम राबविले जातात असे प्रतिपादन विलास केजरकर यांनी केले.ते समीर वर्ल्र्ड कॉम्प्युटर एज्युकेशन येथे आयोजित महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड व एलएलसी भंडारा समीर वर्ड कॉम्प्युटर एज्युकेशनच्या यांच्या संयुक्त वतीने एमएससीआयटी च्या २५ व्या रौप्य महोत्सवी वर्ष व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म दिवस ( बालक दिन), रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन करतांना बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम. के. सि. एल. चे जिल्हा समन्वयक संजय डोहळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य विलास केजरकर, समीर वर्ड कॉम्पुटर एज्युकेशनचे संस्थापक समीर नवाज, एसबीयु समन्वयक निकिता तोरणकर, एम एफ एस इंटरनल टिंक्कल मते, संचालक रोहण नवाज इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांनी (एम.के. सि. एल.) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या कार्यप्रणाली बद्दल तसेच एलएलसी सेंटर सर्व सामान्य नागरिकांना कसे महत्वाचे आहे याविषयी विविध मार्मिक उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच एमएससीआयटी च्या २५ व्या रौप्य महोत्सवी वर्ष व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म दिवस ( बालक दिन), रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभांशू तिरपुडे व प्रास्ताविक समीर नवाज यांनी केले. तर उपस्थितांचे आभार आचल राऊत हीने मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नासीर पटेल, कीर्ती निपाने, आचल राऊत, मानसी गोडाणे, प्रज्वल वंजारी, शितल झेलकर, प्रेरणा खंडाईत, रिना मुळे, आशिया शेख व समीर वर्ड कॉम्प्युटर एज्युकेशनच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here