
शैलेश केलझरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नंदू गट्टूवार यांच्या नेतृत्वात प्रवेश कार्यक्रम पार पडला
चंद्रपूर : शिवसेनेच्या युवासेनेत नव्या तरुणांचा उत्स्फूर्त प्रवेश होत असून संघटनेला नवसंजीवनी मिळाली आहे. शहरात आयोजित प्रवेश कार्यक्रमात अनेक तरुणांनी शिवसेनेच्या वैचारिक भूमिकेवर विश्वास ठेवत युवासेनात प्रवेश केला.
हा कार्यक्रम युवासेना जिल्हाप्रमुख शैलेश केलझरकर यांच्या मार्गदर्शनात आणि लोकसभा संघटक नंदू गट्टूवार यांच्या नेतृत्वात पार पडला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख युवराज धानोरकर, युवासेना लोकसभा अध्यक्ष गणेश म्हहले, युवासेना विधानसभा अध्यक्ष विशाल कवणे, युवासेना शहर प्रमुख पवन यादव, वैद्यकीय जिल्हाप्रमुख चेतन उजवणे, तसेच युवासेना शहर समन्वयक अंकुश कोटरी उपस्थित होते.
या कार्यक्रमात ओंकार वर्गंटीवार यांची युवासेना चंद्रपूर उपशहर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर आर्यन कुलमेथे, मुकुल तामले, अनुज भसारकर, प्रशिक खोब्रागडे, सिप्टीम शेख, संघर्ष मारे, मंथन संतोषवार, आर्यन खंडारे, राज खंडारे, दक्ष डहाट, आदित्य येणप्रेड्डीवार, ओम येणप्रेड्डीवार, पीयूष कस्तुरवार, गोलू येणप्रेड्डीवार आणि सुमित यांनी युवासेनात प्रवेश घेतला.
नव्या तरुणांच्या सहभागामुळे शहरातील युवासेनेचे संघटन अधिक सक्षम झाले असून पक्षविस्ताराला नवचैतन्य प्राप्त झाले आहे, अशी भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.















