
भंडारा : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचा माहोल चांगलाच तापू लागला असून, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मोठ्या उत्साहात नामनिर्देशन अर्ज दाखल केले. या अर्ज दाखल प्रक्रियेला कार्यकर्ते आणि समर्थकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
साकोली नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी( 1) कोकिला सचिन रामटेके ( कोकिळा कानू बडोले ) शिक्षण .: B. A . Graduation .MPSC .DAMLT
प्रभाग क्रमांक 6 अ एस सी आरक्षित कोट्यातून प्राध्यापक (२)रोशन भोवते सर ग्रॅज्युएशन एम एस सी मराठीमध्ये पीएचडी प्रभाग क्रमांक 6ब सर्वसाधारण जागेवरती(3) गीता चुनीलाल वलथरे
ठिवर समाज प्रभाग क्रमांक 5 सर्वसाधारण जाग्यावरती(4) यादोराव मोडकुजी गणवीर पोलीस सेवानिवृत्त प्रभाग क्रमांक 7अ एसएससी आरक्षणातून(5) विद्या डी रंगारी यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला.
या उमेदवारांनी नगरपालिका विकास, पारदर्शक प्रशासन आणि स्थानिक पातळीवरील जनसामान्यांच्या हिताच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा संकल्प व्यक्त केला. अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उत्साह दाखवला.
याच पार्श्वभूमीवर साकोली नगरपंचायतीसाठी देखील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले.
थेट नगराध्यक्ष पदासाठी कोकिळा सचिन रामटेके यांनी अर्ज दाखल केला.
या सर्व उमेदवारांनी साकोली शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला. विशेषत: वंचित बहुजन महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष सौ तनुजा अमित नागदेवे नेतृत्वाच्या सहभागामुळे या निवडणुकीत नवी ऊर्जा दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या सर्व अर्ज दाखल कार्यक्रमाला वंचित बहुजन महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष सौ तनुजा अमित नागदेवे यांच्या प्रमुख उपस्थित होते. त्यांनी या उमेदवारांना शुभेच्छा देताना “ही निवडणूक जनतेच्या प्रश्नांवर केंद्रित राहावी आणि विकासाचा मार्ग वंचितांच्या हक्कांसाठी खुला व्हावा” असा विश्वास व्यक्त केला भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुका जिल्ह्यात VBA च्या या दमदार उमेदवारीमुळे आगामी निवडणुकीत त्रिकोणी लढतीची शक्यता वाढली असून, स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे















