prabodhini news logo
Home चंद्रपूर प्रभाग ९ मध्ये अपक्ष उमेदवार सतीश आकुलवार यांच्या जनसंपर्काला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभाग ९ मध्ये अपक्ष उमेदवार सतीश आकुलवार यांच्या जनसंपर्काला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
195

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – मूल : नगर परिषद प्रभाग क्रमांक ९ मधून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या निर्भीड पत्रकार सतीश आकुलवार यांनी आज जोरदार जनसंपर्क केला. प्रभागातील गल्लीबोळापासून घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधत त्यांनी आपल्या कार्ययोजना व संकल्पनांची माहिती दिली.

जनसंपर्कादरम्यान मतदारांकडून त्यांच्या उमेदवारीचे जोरदार स्वागत करण्यात आले. अनेक नागरिकांनी “या वेळेस तुमचा विजय पक्का आहे, तुम्हीच आमची पहिली पसंती आहात” असे सांगत त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला.

स्थानिक मतदारांमध्ये असा ठाम निर्धार दिसून आला की, राजकीय पक्षांकडून पाडलेल्या ‘पार्सल उमेदवारांना’ या निवडणुकीत घरचा रस्ता दाखवायचा, आणि प्रभागाच्या विकासासाठी प्रामाणिक, कार्यक्षम व थेट जनतेशी जोडलेल्या उमेदवाराला संधी द्यायची.

गेल्या काही दिवसांत प्रभाग ९ मध्ये सतीश आकुलवार यांच्या जनाधारात लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र दिसत असून, या निवडणुकीत त्यांच्या विजयाबाबत चर्चा अधिक जोमाने सुरु झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here