prabodhini news logo
Home ठळक बातम्या क्रांती ज्योती सावित्री फुले नारीरत्न पुरस्काराने आरती निमराडकर यांचा सन्मान

क्रांती ज्योती सावित्री फुले नारीरत्न पुरस्काराने आरती निमराडकर यांचा सन्मान

0
94

वर्धा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – मदत सामाजिक संस्था नागपूरच्या वतीने सेवाश्रम सभागृहात 23 व्या राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता संमेलनात सामाजिक व शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य आरती जीवनप्रकाश निमसडकर यांना मदत या सामाजिक संघटनेतर्फे या संमेलनातील मुख्य मार्गदर्शक नाळ चित्रपटातील अभिनेत्री तक्षशिला वाघधरे, आंबेडकरी विचारवंत राजेश पाटील , मदत या संघटनेचे संस्थापक सचिव दिनेश वाघमारे, सामाजिक कार्यकर्त्या एड.नीळ लाडे या मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नारीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आंबेडकरी विचारवंत अशोक बुरबुरे, जिल्हा उपाध्यक्ष सरिता प्रशांत कुसळे, विदर्भ सचिव रमेश निमसडकर, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य अनिल खडतकर, जिल्हा उपाध्यक्ष आशिष रत्नमाला नरेश लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते ऋषी सोनारकर ,मायाबाई सोनारकर, तालुका बौद्धिक प्रमुख रचना संतोष नगराळे, जिल्हा बौद्धिक प्रमुख प्रणिता खैरकार, तालुका बौद्धिक प्रमुख जीवनप्रकाश निमसडकर, प्रबोधनकार पद्माकर कांबळे , जिल्हाध्यक्ष राहुल नगराळे, जिल्हा कार्यकारी सदस्य सुनील बाभळे, सामाजिक कार्यकर्त्या भारती नगराळे, पिंकी मुंजेवार, यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here