Home चंद्रपूर मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी, संवादावर भर द्या; विजय आपलाच होणार…

मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी, संवादावर भर द्या; विजय आपलाच होणार…

0
120

बल्लारपूर येथे नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसची बैठक संपन्न झाली. यावेळी प्रभाग निहाय आढावा घेऊन उमेदवारांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
या नगरपरिषदेत काँग्रेस पक्षाला अनुकूल वातावरण असून मतदारांचा विश्वास पक्षावर आहे. नगराध्यक्ष पदांसह नगरसेवक पदासाठी दिलेले सर्व उमेदवार हे अभ्यासू, उच्च शिक्षित आणि लोकसेवेची जाण असल्याने येथील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्यात आहे.
त्यामुळे लोकभावना आपल्या बाजूला आहे. तरी सर्व उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर देत आपला विचार आणि जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आगामी काळात करण्यात येणाऱ्या कामांची माहिती द्यावी असे आवाहन केले.
या बैठकीला खासदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हा अध्यक्ष, माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संतोषसिंह रावत, डॉ. रजनीताई हजारे, डॉ. अनिल वाढई, नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार अलकाताई वाढई, काँग्रेस शहराध्यक्ष देवेंद्र आर्या यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here