prabodhini news logo
Home कारंजा प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – भारताचे संविधान

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष लेख – भारताचे संविधान

0
97

समानतेचा बांधून बंधारा
अडविले विषमतेचे पाणी
माणसाला दिला माणुसकीधर्म
झालो भिमरायाचे ऋणी 

बाबा…. तुमच्या वैचारिक विचाराची क्षमता व तत्वज्ञानाची खोली ही अथांग आहे ते कोणीही मोजू शकत नाही. तुमचा या देशात जन्म झाला अन् या देशातील खितपत पडलेल्या अस्पृश्य, बहूजन समाजाचे पांग फिटले , तुम्ही त्यांना जगण्याला बळ दिलं माणुसकी ने जगण्यासाठी धम्म दिला.त्याची सुज्ञात गणती व्हावी म्हणून ज्ञानाचे दार खुले करून दिली. तुम्ही समाजासाठी जे केले ते अतुलनीय आहे. तुमच्या संसाराची वाताहत होत असताना, एकापाठोपाठ स्वकीयांच्या मरणाचे आघात त्यातही तुम्ही शिक्षणात तसूभरही फरक न पडू देता परदेशात शिक्षण घेत राहीले. व पोटच्या लेकरापेक्षा समाजाच्या हितासाठी झटत गेले . तुमच्या उपकाराच्या उत्तराईची क्षमता नाही बाबा आमच्यात…पण तुमच्या कर्तृत्ववान उदांत्तमनाचा वसा जपत असतो आम्ही मनामनात… तुम्ही संविधानाची जी देशाला देणगी दिली. 
ती सर्वासाठी हितकारक असले तरी मनुवादी अजगराच्या विळख्यात आज संविधान गुरफटले आहे.त्यासाठी समता एकात्मता बंधुत्वाची देशाला खूप गरज आहे. संविधान फक्त एका जाती धर्मापुरते मर्यादित नसून सर्व देशवासीयांना
संविधानाची गरज आहे. हे आजही कर्मठ वृत्तीचे लोक मानायला तयार नाही. ही आजची वास्तविकता आहे.

भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत राष्ट्रीय संविधान आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार (निर्माता) आहे.
भारताची राज्यघटना उद्देशिका ( सफरनामा) मुख्य भाग बारा पुरवण्या व परिशिष्टे अशा स्वरूपात विभागली गेली आहे, सुरवातीच्या 395 कलमापैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत . सध्या जानेवारी 2020 राज्यघटनेत 448 कलमे असून भारताचे संविधान हे एका सार्वभौम राष्टाने तयार केलेले जगातील सर्वात मोठे संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकराना संविधानाचे निर्माते असण्याचे श्रेय दिले जाते. कारण ते संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते.
भारताची राज्यघटना ही काहीशी ताठर तर काहीशी लवचिक आहे. आपल्या घटनेने भारतीय नागरिकाला एकेरी नागरिकत्व दिले आहे. प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला आहे.
मुख्य पान उद्देशिका : भारतीय संविधानाच्या उद्देशिके- प्रमाने भारत हे सार्वभौम ,समाजवादी,धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक आहे. सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय , आचार विचार, धर्म, श्रध्दा, याचे स्वातंत्र्य आणि राजकीय समानता व समान संधी देण्याचे अभिवचन देते. मुळ उद्देशिकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे शब्द नव्हते, राज्यघटनेच्या 42 व्या दुरूस्ती द्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले.
1950 चे मुळ संविधान नवी दिल्लीतील संसद ग्रंथालय इमारतीत नायट्रोजन ने भरलेल्या पेटीत जतन केले आहे.
प्रेम बिहारी नारायन रायजादा अशी व्यक्ती आहे. ज्याने स्वताच्या हाताने संविधानाची मुळप्रत इंग्रजी मध्ये लिहीली या संविधानाचे ते सुलेखनकार आहे. या कामासाठी त्यांना सहा महिने लागले. आणि एकूण 432 निब्स झिजल्या. मुळ राज्यघटना त्यांनी ओघवत्या तिरक्या शैलीत लिहिली होती. मुळ राज्यघटनेच्या हिंदी आवृतीचे कॅलिग्राफी वसंत
कृष्ण वैद्य यांनी केले. भारतीय संविधान 2 वर्षे 11महीने 18 दिवसात तयार झाले 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्विकारण्यात आले. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून घोषित करण्यात आला .
सुरवातीला संविधान सभेत 389 सदस्य होते.जे भारताच्या फाळणीनंतर घटून 299 झाले .
389 -292 पैकी सरकारी प्रांत 4 मुख्य आयुक्त प्रांताचे आणि 93 संस्थानिकाचे सदस्य होते.
विविध प्रदेश जाती लिंग आणि विभागातून घेतले होते.
त्यात विविध तज्ञ आणि राजकीय प्रतिनिधीचाही समावेश होता हा दस्तऐवज मुलभूत राजकीय संहिता, संरचना कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थाची कर्तव्य आणि मुलभूत अधिकार , मार्ग दर्शक तत्वे आणि नागरिकाची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो.
संविधान हे एखाद्या राष्टाध्यक्ष मुलभूत तत्व आणि कायदे याचा संग्रह आहे. जे देशाचा कारभार कसा चालेल हे ठरवते. नागरिकाचे अधिकार आणि स्वातंत्र्य याबद्दलची हमी देते. ते सरकार कसे संघटीत आहे . आणि विविध राजकीय घटकामध्ये शक्तीचे वाटप कसे केले जाते हे स्पष्ट करते. संविधानाचे मुख्य दोन प्रकार आहेत लिखित आणि अलिखित या व्यतिरिक्त एकात्मता, संघराज्य फेडरल अशा स्वरूपातही केले आहे . संविधानाची हिंदी प्रत वसंत कृष्ण वैद्य स्वतः च्या हस्ताक्षरात लिहिली होती. संविधानाच्या हिंदी प्रतमध्ये 264 पृष्ठे आहेत त्याचे वजन 14 किलो आहे.24 जानेवारी1950 रोजी संविधान सभेतील 284 सदस्यांनी त्यावर साक्षऱ्या करून सहमती दर्शवली आहे.
भारतीय संविधानाचे जनक डॉ बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले
होते, आणि त्यांनी भारताची राज्यघटना तयार करण्यात मुख्य भूमिका बजावली . म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेब यांना ओळखल्या जाते. प्रत्येक जाती धर्मासाठी त्यांनी केलेले कार्य महान आहे.
बाबासाहेब यांच्या तत्त्वज्ञानाला आज संविधान दिनी

नंदा भगत / कारंजा लाड
वाशिम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here