prabodhini news logo
Home चंद्रपूर वरोरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसच एकमेव पर्याय : वरोरा नगरपरिषद काँग्रेस उमेदवारांच्या...

वरोरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसच एकमेव पर्याय : वरोरा नगरपरिषद काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅली व सभा…

0
95
दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत सत्ता असतानाही केवळ विकासाच्या थापा मारणाऱ्या भाजप व महायुतीच्या घटक पक्षांनी सर्व सामान्य जनतेचा विकास साधला नाही. या उलट राज्यात महागाई, बेरोजगारी जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड दरवाढ झाली व राज्य आर्थिक कर्जाच्या ओझ्याखाली आले.
आजचे हे लुटारू व बेइमानांचे सरकार असून वरोरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसच एकमेव पर्याय आहे; असे आज नगर परिषद निवडणुकांच्या प्रचाराच्या अंतिम दिवशी वरोरा येथील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्चना आशिष ठाकरे व सर्व १३ प्रभागाचे नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत स्पष्टपणे नमूद केले.
वरोरा येथे माता मंदिर चौकापासून ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात पर्यंत काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. वरोरा शहरात नागरिकांचे शुद्ध पेयजल, घन कचरा व्यवस्थापन, अंतर्गत रस्ते, पथदिवे यासह अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री केवळ विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार असल्याचे सांगतात, मात्र प्रत्यक्षात काहीच करत नाही. अनेक जनकल्याणकारी योजनांचे मागील ६ महिन्यांपासून पैसे सरकारकडे अडकले आहेत. राज्यातील महायुतीची त्रिशंकू सरकार आपसात भांडतांना जनतेसमोर तमाशा मांडत आहे.
अशात सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत गरजा सोडविण्यासाठी केवळ काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे. म्हणून आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी विजय करून शहराच्या विकासाला गती द्यावी असे आवाहन केले.
तर वरोरा शहरात विरोधकांकडून होत असलेल्या अर्थकारण, मतदारांना प्रलोभने व गढूळ राजकारणाची पोलखोल करीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विरोधकांची हवाच काढली.
स्वच्छ सुंदर वरोराच्या विकासासाठी काँग्रेसला मतदान करावे असे आवाहन शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.
या आयोजित प्रचार सभेस चंद्रपूर लोकसभा खासदार प्रतिभाताई धानोरकर, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्चना आशिष ठाकरे, माजी नगराध्यक्ष अहतेश्याम अली, विलास टिपले, कुसुमताई जोगी, गजानन मेश्राम, राजू चिकटे, डॉ.खापणे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मिलिंद भोयर, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तथा सर्व १३ प्रभागाचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here