prabodhini news logo
Home चंद्रपूर मूल नगर परिषद निवडणूक 2025 – रण धुमाळी

मूल नगर परिषद निवडणूक 2025 – रण धुमाळी

0
97

प्रभाग क्र. 9 मध्ये अपक्ष उमेदवार सतीश आकुलवार यांची प्रचारात आघाडी

आकुलवार यांच्या झंझावातामुळे विरोधकांची डोकेदुखी वाढली

मूल प्रतिनिधी – मूल नगर परिषदेची निवडणूक उद्या होत असून आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्व उमेदवार अंतिम टप्प्यातील जोरदार जनसंपर्कात गुंतलेले दिसत आहेत. “मतदानाचा हक्क आपल्या सेवेसाठी द्या” असा भावनिक आवाहन प्रत्येक उमेदवाराकडून मतदारांना केला जात आहे.

मात्र प्रभाग क्र. 9 ब गटामध्ये अपक्ष उमेदवार सतीश सूर्यभान आकुलवार यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली असून, या प्रभागात तिरंगी लढत अधिक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या काही दिवसांत सतीश आकुलवार यांचा अचानक वाढलेला जनसंपर्क, घराघरातील भेटी, महिलांशी व जेष्ठ नागरिकांशी झालेला संवाद यामुळे विरोधी पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढलेली दिसून येत आहे. आकुलवार यांच्या झंझावाती प्रचाराला रोखण्यासाठी दोन्ही पक्षांचे उमेदवार विविध युक्त्या राबवत असल्याचीही चर्चा वॉर्डात रंगली आहे.

नेहमी प्रभागातील नागरिकांच्या सुख-दु:खात सहभागी राहणारा, निर्भीड आणि निष्पक्ष आवाज म्हणून सतीश आकुलवार यांची ओळख गेल्या अनेक वर्षांत निर्माण झाली आहे. त्यामुळे महिला मतदार, युवकवर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांचा कल सध्या आकुलवार यांच्या बाजूने झुकल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

तथापि, अंतिम निर्णय मतदारच देणार आहेत. प्रभाग क्र. 9 ब मधील जनतेचा कौल कोणाच्या बाजूने लागणार हे मात्र ३ तारखेला मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here