prabodhini news logo
Home चंद्रपूर मुकेश जिवतोडे यांना धमकी देणाऱ्या विरोधात कारवाईची मागणी – युवासेनेचा इशारा

मुकेश जिवतोडे यांना धमकी देणाऱ्या विरोधात कारवाईची मागणी – युवासेनेचा इशारा

0
159

तत्काळ धमकी देणाऱ्या विरोधात कारवाही करा अन्यथा आंदोलन उभारू – सुमित हस्तक

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – शिवसेना लोकसभा संघटक मा. मुकेश जिवतोडे व जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी ३ डिसेंबर २०२५ रोजी वरोरा शहरात मोठ्या प्रमाणात अवैध सुगंधित तंबाखू व अमली पदार्थ साठा जप्त करण्याची महत्त्वपूर्ण माहिती पोलिस प्रशासनाला कळवली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शहरातील अनेक ठिकाणी कारवाई करून अवैध धंद्यावर लगाम लावण्याचे कार्य केले.

या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यातील संबंधित लोकांनी सोशल मीडियावर मुकेश भाऊंविषयी घाणेरडी शिवीगाळ, अपमानास्पद मजकूर प्रसारित केला असून भविष्यात त्या व्यक्तींमुळे त्यांच्यावर जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

त्या अनुषंगाने आज भद्रावती पोलीस ठाणेदार साहेब यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन युवासेना जिल्हा प्रमुख आलेख भाऊ रट्टे व युवासेना लोकसभा सचिव सूरज भाऊ शाहा यांच्या मार्गदर्शनात आणि युवासेना जिल्हा संघटक सुमित भाऊ हस्तक यांच्या नेतृत्वात देण्यात आले.

या निवेदनात पुढील मुद्द्यांवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे :

सोशल मीडियावर घाणेरड्या भाषेत शिवीगाळ व बदनामी करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत.
संबंधित खात्यांची चौकशी करून आवश्यक दंडात्मक कारवाई करावी.
कायद्याच्या अंमलबजावणीस सहकार्य करताना निर्माण झालेल्या जीवितधोक्याच्या पार्श्वभूमीवर मा. मुकेश जीवतोडे यांना पोलिस संरक्षण उपलब्ध करून द्यावे.

युवासेना सदैव सामाजिक हित, कायद्याची अंमलबजावणी व सुव्यवस्था टिकवण्यासाठी लढत राहणार आहे. अवैध घटकांविरोधात उभे राहणाऱ्यांचे रक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी युवासेना शहर प्रमुख राज चव्हाण, गोलू आस्वले, अनोखा गेडाम, दिनेश पचारे, राकेश पचारे, तृणाल उंबरकर, सुमित मोजे, सिद्धार्थ मेश्राम, सुरेश पार्थमवर व युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here