prabodhini news logo
Home ठळक बातम्या म्हाडा कॉलनी परिसरात रस्त्याची दुर्दशा; प्रवाशांना करावा लागतो जीवघेणे प्रवास

म्हाडा कॉलनी परिसरात रस्त्याची दुर्दशा; प्रवाशांना करावा लागतो जीवघेणे प्रवास

0
151

कैलास गायकवाड कार्यकारी संपादक प्रबोधिनी न्युज – मुलुंड पूर्व/मुंबई: म्हाडा कॉलनी नवघर पोलीस स्टेशन समोरील रस्ता अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत झालेला आहे,
म्हाडा कॉलनी परिसरातील वास्तव्यास असलेल्या नागरिकांना आणि वाहतूकदारांना रस्त्यावरुन प्रवास करत असताना जीव घेणा प्रवास करावा लागत आहे, दिनांक 14/11/2025रोजी तक्रार देऊन मुंबई महापालिका आयुक्त भुषण गगराणी आणि टी विभाग सहाय्यक आयुक्त योगिता कोल्हे यांना सदरहुन रस्ताची दुर्दशा झालेली आहे रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले असून पावसाळ्यात खड्यात पाणी भरल्याने रस्ताची बिकट परिस्थिती झाली असल्याने त्याचा त्रास असे आम्ही निदर्शनास आणून देऊन नवघर पोलीस समोरचा रस्ता नवीन बनवण्यात यावा मी सामाजिक कार्यकर्ता असल्याने टी विभाग सहाय्यक आयुक्त योगिता कोल्हे यांच्याशी विजय तुकाराम देठे भरत साळवे हेमंत जगधने विनोद जगताप आम्ही भेट घेऊन सांगितले रोजी मुंबई महानगर पालिका यांना कळविले रस्ता पुर्ण खराब झाल्यामुळे त्याचा परिणाम लोकांना भोगावा लागतो आपण तात्काळ नवीन रस्ता बनवण्यात यावा, योगिता कोल्हे यांनी आम्हाला सांगितले म्हाडा कॉलनी मधील रस्ता आमच्या अखत्यारीत येत नाही परंतु आम्ही गृहनिर्माण म्हाडा यांना रस्ता बनवण्यासाठी पत्र देऊन कळवतो दिनांक 28/11/2025रोजी उप अभियंता क्र 1पूर्व मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ गृहनिर्माण म्हाडा यांना टी विभाग मुलुंड यांनी म्हाडा कॉलनी नवघर पोलीस स्टेशन समोरील रस्ता बनवण्यास तसे पत्र देऊन अजून ही रस्त्याचे काम झालेले नाही,
उप अभियंता क्र 1पूर्व मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ गृहनिर्माण म्हाडा यांनी गांभीर्याने विचार करुन आपल्या अखत्यारीत येत असलेला रस्ता लवकरात लवकर पूर्ण बनवून देण्यात यावा
सामान्य नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here