prabodhini news logo
Home ठळक बातम्या पुणे-बारामतीत ED ची धडक! 108 कोटींच्या अपहार प्रकरणी फरार आनंद लोखंडेच्या मालमत्तांवर...

पुणे-बारामतीत ED ची धडक! 108 कोटींच्या अपहार प्रकरणी फरार आनंद लोखंडेच्या मालमत्तांवर छापे; राजकीय कनेक्शनची चर्चा

0
95

पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – गेल्या काही दिवसांपासून सक्रिय असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज पुणे आणि बारामती जिल्ह्यांमध्ये मोठी कारवाई केली आहे. विद्यानंद डेअरीशी संबंधित तब्बल ₹108 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार आणि गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणात ईडीने ही धडक मोहीम उघडली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी, आनंद सतीश लोखंडे सध्या फरार आहे.

ईडीच्या पथकांनी पुणे जिल्ह्यात दोन ठिकाणी आणि बारामती तालुक्यात जळोची, खताळ पट्टा, तसेच झारगडवाडी यांसह तीन ठिकाणी एकाच वेळी शोधमोहीम सुरू केली. फरार आनंद लोखंडे आणि त्याची पत्नी विद्या लोखंडे यांच्याशी संबंधित मालमत्तांवर हे छापे टाकण्यात आले. दोघांवरही विविध ठिकाणी मिळून ₹108 कोटींपेक्षा जास्त व्यवहार केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

नेमका घोटाळा काय?

आरोपींनी बारामती डेअरी प्रायव्हेट लिमिटेड आणि पुणे-मुंबईतील अनेक व्यावसायिकांना दुग्ध व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून ₹10 कोटींहून अधिक रुपयांना गंडा घातला.
तसेच मुंबईतील एका कंपनीकडून ₹2 कोटींचे लोणी आणि सुमारे ₹93 लाखांचे दूध खरेदी करून त्याचे पैसे थकवल्याचेही तपासात उघड झाले आहे.

दरम्यान, या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, यात शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांवर पतसंस्थांचे कर्ज काढून फसवणूक करणे तसेच मंत्रालयातील काही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचीही गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक केल्याची माहिती मिळाली आहे.

आनंद लोखंडे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता आणि निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे.

लोखंडे याने आमदार रोहित पवारांच्या विधानसभा मतदारसंघात शाळा बांधणे आणि गणवेश वाटणे अशा सामाजिक कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केल्याची माहिती समोर येत आहे. ईडीची कारवाई मुळे बारामती आणि पुणे जिल्ह्यांमध्ये राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here