
बल्लारपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : पेपर मिल पी.एम.#7 ग्रुप युवा नेता राहुलबाबू पुगलिया यांच्या वाढदिवसानिमित्त महाकाली मंदिर परिसरात सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माता महाकाली देवींच्या मंगलपूजनाने झाली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी राहुल पुगलिया यांच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि यशासाठी विशेष प्रार्थना केली.
पूजनानंतर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांना मसाले भात प्रसादरूपाने वाटप करण्यात आले. प्रसादाचा स्वीकार करताना भाविकांनी राहुल पुगलिया यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमात पेपर मिल मजदूर सभेचे महासचिव वसंत मांढरे, कोषाध्यक्ष रामदास वाग्धरकर, सहसचिव नायरजी, सहसचिव वीरेंद्र आर्या, तसेच अनिल तुम्गीडवार, गजानन दिवसे, उमेश कोलावार, सुदर्शन पुल्ली, दिवाकर झाडे,सुनील बावणे, यादव शंभरकर आदी मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.
उत्कृष्ट नियोजन व व्यवस्था आतिश अक्केवार यांनी केली. तसेच शेखर कोतपलीवार, श्रीकांत पप्पुलवार, सुनील दुबे, अंकुश नारलावार, महेश ठोमरे, शंकर महाकाली, वामन खडदतकर, सुरज ठाकूर, राकेश तालावार, संजू सुद्धाला, प्रकाश सिंग, प्रांजल बालपांडे, विजय शर्मा, शेख सलमान, अमोल गावंडे, राहुल गावंडे, तिरुपती, गोडशेला, सय्यद करीम, सतीश नेरवटला, उमेश नवघरे, आदित्य साहू, अमित अनेजा, गोपाल कुडुपले, आनंद सिंग, बॉबी डोंगे, राजकुमार यादव, राजकुमार जैस्वाल, प्रकाश गोलकर, जगदीश सिंग, पवन असुरी, विनोद सुरमवार, तिरुपती, गोडशेला, सय्यद करीम, यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.















