
लातूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांचे आज लातूर येथे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. आज सकाळी सुमारे 6:30 वाजता त्यांनी लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते.
शिवराज पाटील चाकुरकर यांनी लातूरच्या नगरपालिकेच्या राजकारणापासून सुरुवात केली. पण ते रमले मात्र दिल्लीमध्ये. १९८० मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले आणि त्यानंतर १९९९ पर्यंत सलग सात निवडणुका जिंकत लोकसभेतील एक प्रभावी नेता म्हणून उदयास आले.















