prabodhini news logo
Home कारंजा राज ठाकरेंच्या मनसेचा शहर अध्यक्ष हरीश हेडा अपघातात मृत्यु

राज ठाकरेंच्या मनसेचा शहर अध्यक्ष हरीश हेडा अपघातात मृत्यु

0
105

शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – कारंजा (लाड) : स्थानिक कारंजा नगरीमधून जाणाऱ्या,नागपूर संभाजीनगर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक कारंजा शहर अध्यक्ष हरीश हेडा जागीच ठार झाले. ही घटना बुधवार दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८.०० वाजताच्या दरम्यान घडली.

प्राप्त माहितीनुसार, हरीश हेडा हे मोटरसायकलने कारंजाकडे येत असताना समोरून येणाऱ्या मालवाहू वाहनाने (एमएच ३० बिडी ७४९०) त्यांच्या मोटरसायकलला नागपूर संभाजीनगर नागपूर महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ जोरदार धडक दिली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यु झाला. दरम्यान, अपघात झाल्याची माहिती शिवनेरी रुग्णवाहिकेचे संचालक अनुप ठाकरे यांनी कळवताच शिवनेरी रुग्णवाहिकेचे विनोद खोंड वेगाने घटनास्थळी पोहचले. व त्यांना कारंजा उपजिल्हा रुग्णालय दाखल केले. परंतु येथे कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले. हरीश हेडा हे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मागील सुमारे दहा वर्षापासून सक्रिय आहेत. अलीकडे पार पडलेल्या कारंजा नगरपरिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी सौ.अलका हेडा ह्या अपक्ष उमेदवार म्हणून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे त्यांचे पक्ष पदाधिकारी,कार्यकर्ते,कुटुंबीय, तसेच हितचिंतक मित्रमंडळी व्यथीत झाले असून शोकसंवेदना प्रकट करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here