
रामगोपाल अट्टेला
तालुका विशेष प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क सिरोंचा
सिरोंचा- दिनांक 3 जानेवारी 2026 कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सिरोंचा शाळेत आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंती अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या बालिका दिनाच्या औचित्य साधून शाळेचे मुख्याध्यापिका मनीषा साखरे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा.प्रांजली कुलकर्णी ( पोलीस उपनिरीक्षक) तसेच सुनीता भगत ( मुक्तीपथ तालुका समन्वयक) विद्यार्थी पालक प्रतिनिधी म्हणून श्रीमती.सुवर्णाताई कोंडा यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांनी सावित्री फुले आणि ज्योतिराव फुले यांच्या वेशभूषा परिधान करून नाविन्यपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्याच्या स्थानावरून बोलताना कुलकर्णी मॅडम म्हणाले की,एक महान माऊलीने स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडली जर सावित्री नसत्या,तर आज मी इथे बोलू शकले नसते, आणि तुम्ही समोर बसून शिकू शकले नसते. यावर अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर सुनीता भगत मॅडम यांनी सावित्रीबाईंनी सोसलेल्या दगड माती झेलून दिलेल्या शिक्षणामुळेच आज अनेक क्षेत्रात जसे की,महिला डॉक्टर, इंजिनियर, शिक्षिका वकील, बँक मॅनेजर्स असे मोठमोठ्या पदावर पुरुषांबरोबर महिला कार्यरत आहेत यावर प्रकाश टाकले, मात्र विशिष्ट वयात वेगळा वळण सुद्धा लागू शकते, वाईट मार्गाने जाणे, कमी वयातील झालेल्या लग्नामुळे अनेक दुष्परिणाम होताना दिसतात त्यापासून आपण सावध राहायला पाहिजे यावर त्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका साखरे मॅडम यांनी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील यश प्राप्त केलेल्या माजी विद्यार्थिनीचा आढावा घेत सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित सादर केलेल्या गीत गायन, नाटक,विद्यार्थ्यांचे मनोगत, एकपात्री *होय मी सावित्री* यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मुलींचे अभिनंदन करत, हे सर्व विद्यार्थी माझे सावित्रीच्या लेकी आहेत ‘ ‘ *माझे सावित्री* ‘ असे गौरवोद्गार काढले, पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले की, आपण शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाच्या नाव, शाळेचे नाव, पर्यायाने स्व जिल्ह्याचा व देशाचं नाव उज्वल केले पाहिजेत असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी कुमारी. जेला कोनम, रितीशा कोंडा यांनी तर उपस्थित मान्यवरांचे आभार श्री आर.अट्टेला यांनी मानले. या कार्यक्रमासाठी वसतिगृहप्रमुख, लेखापाल, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.















