
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – येथील श्रीराम नगर परिसरातील संत शिवराम महाराज उच्च प्राथमिक शाळा तथा माध्यमिक विद्यालय व स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंट तसेच प्रभाग 11 आणि 12 मधील भंडारा नगरवासी यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 मध्ये निवडून आलेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका यांचा सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला . या कार्यक्रमात भंडारा शहराच्या प्रथम नागरिक म्हणून नवनियुक्त नगराध्यक्षा सौ. मधुराताई मिलिंद मदनकर नवनियुक्त नगरसेवक तथा भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष आशुभाऊ गोंडाने प्रभाग 11 च्या नगरसेविका सौं. शुभांगीताई लोकेशभाऊ खोब्रागडे प्रभाग 12 चे नगरसेवक मंगेशभाऊ वंजारी नव नियुक्त नगरसेविका प्रीतीताई गाढवे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या नगरसेवकांचा भंडारा नगरपरिषद निवडणुकीमध्ये प्रचंड मतांनी निवडून आल्याबद्दल भंडारा नगरवासी व संत शिवराम महाराज विद्यालयाच्या वतीने शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभ कार्यक्रमात नागराध्यक्ष मधुराताई मदणकर यांचा सत्कार संत शिवराम महाराज माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अर्चना भोयर यांच्या हस्ते करण्यात आले तर भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष तथा नवनियुक्त नगरसेवक आशुभाऊ गोंडाणे यांचे स्वागत संत शिवराम महाराज उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक देवचंद चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले नगरसेविका शुभांगीताई खोब्रागडे यांचा सत्कार सौं. राधिका बांते यांनी केले. प्रभाग 12 चे नवनियुक्त नगरसेवक मंगेशभाऊ वंजारी यांचा सत्कार शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष सैनपाल वासनिक यांनी केले तर नगरसेविका सौं. प्रीतीताई गाढवे यांचा सत्कार सौं पारबताबाई बिसने यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी नगराध्यक्ष मधुरा मदनकर म्हणाल्या कीआपण सावित्रीच्या लेकी आहोत त्यांनी शिक्षणाची संधी दिली तेव्हा उंच भरारी घेऊन जीवन उद्धार करा व देश विकासासाठी प्रगती करा. नगरवासियांनी मला निवडून दिल जे आश्वासन दिले ते पुर्ण करण्याचे कामं करणार आहे. सत्कार मूर्ती आशुभाऊ गोंडाने म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने जिल्हाध्यक्ष पद मला देऊन विश्वास दाखविला पक्ष श्रेष्टीने भंडारा नगरवासियांना जो आश्वासन दिला. तो आम्ही नक्की पुर्ण करून भंडारा शहराचा विकास करण्याचा आमचा उद्दिष्ट आहे. ते म्हणाले की मी मागील कार्यकाळातही नगरसेवक होतो तेव्हा या शाळेने माझा सत्कार केला. आताही मला सन्मानित करण्यात येत आहे. या शाळेच्या सभोवतालंच परिसर सुशोभीत करून सुंदर बनवून देण्याची हमी आम्ही नागराध्यक्षासह आम्ही नगरसेवक आपल्याला आश्वासन देतो. असे म्हणाले. नगरसेवक मंगेश वंजारी यांनी केंद्रसरकार, राज्यसरकार आणि नगरपरिषदवरही तेच सरकार असल्याने आम्ही भंडारा नगराचा आणि आपल्या प्रभागाचा विकास करणार असल्याची ग्वाही दिली. आणि सौं.शुभांगीताई खोब्रागडे म्हणाल्या की आपल्या प्रभागातील ही आपली शाळा म्हणून या मुलांच्या प्रगती आणि नगरविकासातील कामासाठी आम्ही अग्रगण्य राहू असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी मनमोहन भोयर,लोकेशभाऊ खोब्रागडे, अविनाश चटूले, आनंद चरडे,चंद्रशेखर जगनाडे, जगन मस्के,माहुरे, मते,आदी भंडारा नगरवासिंनी नागरीसत्कार केला तर विद्यालयाचे धीरज बांते, अल्का हटवार, दारासिंग चौव्हाण,रंजना भिवगडे, प्रमिला मेहर, माया वैद्ये, शिल्पा मरकाम, नेताम,भावना जगनाडे, महेश दूधकार, राजू निंबार्ते, जागेश बांते, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि श्रीराम नगर तकिया वार्ड भंडारा वार्ड क्रमांक ११ वार्ड क्रमांक १२ येथील सर्व नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शेखर बोरकर यांनी केले तर आभार देवचंद चौधरी यांनी मानले .















