prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सावित्रीबाई फुले

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सावित्रीबाई फुले

0
435

सावित्रीमाई तुझ्या संघर्षाने
स्त्री गेली उच्च पदावर
उभी राहिली ती स्वबळावर
स्त्री शक्तीचा भरला जागर

शेण,माती ,दगड झेललेस
शब्दांचे घावही सोसलेस
डोळ्यातिल अश्रूंना ढळू न देता
धैर्याने पाऊल पुढे टाकलेस

क्रांतीची मशाल घेऊन हाती
ज्ञानामृत पाजलेस स्त्रीयांना
तुझ्या किर्तीच्या कळसाला
देतो आम्ही मानवंदना

शिलवान, गुणवान, धैर्यवान माई
तुच क्रांतीज्योतीची सती सावित्री
हतिहासी तुझी अमर कहाणी
स्त्री शक्तीची तुच दायित्री

तुझ्यामुळेच सावित्रीमाई
स्त्री जन्म सार्थक झाला
गगण भरारी घेतो आम्ही
संघर्ष तुम्ही जिवनभर केला

सावित्रीमाई तुझे उपकार
सदा सर्वदा ठेवू स्मरणी
तुझ्या पाऊलांवर पाऊल टाकून
आठवू सदैव तुझी करणी

सौ.रंजना धर्मपाल आटे
जिल्हा वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here