
साकोली/भंडारा प्रतिनिधी – ४ जाने. २०२६ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि कवयित्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंती निमित्त, ३ जाने. रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र खांबा येथील कर्मचारी व मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले व जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दरम्यान डॉ. पवन फुंडे यांनी महिलांना महिला मुक्ती दिन व बालिका दिनाचे महत्व सांगून सक्षम होण्यास सांगितले तर आपल्या लहान बाळांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन केले. प्रसंगी डॉ. पवन फुंडे, भेंडारकर, सचिन रिनाईत, निलेश मेश्राम, निखिल कठाणे, श्रीकांत पुसाम, गुरूदास डोंगरवार व महिला ज्योती जांभुळकर, सीमा राणे व इतर महिला उपस्थित होते.















