prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सावित्रीबाई फुले

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सावित्रीबाई फुले

0
69

झिजवली काया
ज्योतींच्या साऊनी
उजळल्या ज्ञानज्योती
शिकलेल्या महिला पाहुनी…

तिचे कष्टशिस्तबद्ध
पुनवडी पुण्यात
सोन्याचे दिवस महिला पाहतील
ध्यास एकच साऊंच्या मनात…

दिवसाचा एक एक क्षण
घडवून गेली ती क्रांती
साऊ तुमच्यामुळे जगण्यात
नाही आता आर्थिकभ्रांती…

कुणी डॉक्टर वकील इंजिनियर
प्रधानमंत्री राष्ट्रपती
सक्षम पायावर उभे राहून
सांभाळतात घरगृहस्थी…

नाही कुठला अंगाराधुपारा
अंधश्रद्धेचा तो बाजार
प्लेगच्या साथीला
जडला साउना आजार….

करतो विनम्र अभिवादन
मनोज साऊंच्या प्रतिमेला
स्मरण राहील उपकारांचे
अभिवचन देतो या जयंतीला

गायकवाड मनोज रामचंद्र
शहापूर जिल्हा ठाणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here