
मार्ग कठीण होता
नाहीच मानली हार
घेऊन हाती लेखणी
लढण्यास होती तैयार।।१।।
एक एक पाऊल तू
पुढे टाकत गेलीस
लेखणीच्या बळावर
जग जिंकून आलीस।।२।।
शिक्षणाचे महत्वही
कळाले होतेच तुला
म्हणून शेण टोपली
टाकून दिले बाजूला।।३।।
जिद्द होती तुझ्या अंगी
शिक्षणाचा होता ध्यास
नक्की जिंकेल ज्ञानाला
मनात होता विश्वास।।४।।
कणकण वेचलीस
ज्ञान तुला हे मिळाले
शिक्षणाचे महत्त्वही
आज आम्हाला कळाले।।५।।
झाले साऱ्यांचेच भले
यशस्वी झाली लेखणी
तुझा सारखा शिक्षक
जगातच नाही कोणी।।७।।
तुझे उपकार माई
कधी फिटणार नाही
चालवू तुझाच वसा
मागे हटणार नाही।।८।।
ज्ञानाचीही ज्योत आम्ही
लावू आम्ही घरोघरी
सावित्री तुझेच नाव
पोहचवू नभावरी।।१०।।
प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर















