prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सावित्रीबाई फुले

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सावित्रीबाई फुले

0
110

साऊ माझी माय तुझ्यामुळे
उजळल्या जगी दशदिशा
ज्ञानरुपी ज्ञानदिवा लावू
सकलांच्या उंचावल्या आशा

शिक्षणाचा अधिकार दिला
सान थोर मुलीबायकांना
साऊ राहतील उपकार
शिक्षित केलेस सकलांना

ज्ञानरूपी दिवे उजळले
लेकी बाळी झाल्या सुशिक्षित
तुच ती सावित्रीबाई फुले
किर्ती जगतात अखंडित

तूच दिले प्रगतीचे पंख
छाटण्याला आले महामुर्ख
केला माघारी न जरी शंख
उपकार मानूया असंख्य

साक्षरता,समानता येता
शिक्षणाचा वाढेलही ध्यास
सामाजिक प्रतिष्ठा आणि
व्यक्तीगत जीवन विकास

(स्वरचित)
©® नीला चित्रे
चिंचवड पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here