prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी साहित्य मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सावित्रीबाईची जीवन...

प्रबोधिनी साहित्य मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – सावित्रीबाईची जीवन गाथा

0
354

स्त्री संघर्षाची अलौकिक जीवन गाथा
ठणकला कर्मठांचा माथा
तुकारामा सम बुडवू पाही फुल्यांची विरगाथा
अक्षरात अनंत झाली क्रांती ज्योतीची कथा…१

पदरात सजवून चिखल
शिंतोड्याची केली अक्षरं
शिव्या लाखोळ्यांची करुन माळ
भारतीय स्त्री केली साक्षर… २

सत्यशोधक विचार सरणी
बहु्गुणी बहुदेखणी
सावित्रीमाई तुझी लेखणी
अक्षरांची तूच खरी जननी…३

सुरेख शब्दांची शिल्पकार
शिलेदार स्त्री शिक्षणाची
शारदेची खरी उपासक
पुण्याई कठोर श्रमांची..४

अराजकता मनुवाद्यांची
रुजली मनामनात
लेखणीने जागृत केला गाव
थेट भिडली -लढली विषमतेला
शब्दांनी घातला मर्मावर घाव…..५

अनिष्ट रूढी परंपरा तोडून गुलामगिरी
पीडितांचा आधारस्तंभ
सुरू केला अनाथालय
दासी मुरली जरठ विवाह केला बंद
थोर समाजसुधारक होती माझी साऊ माय…. ६

महामारीत पुकारले परिस्थिती शी युद्ध
रुग्णांची सेवा केली अहोरात्र
वाचवून ग्रस्ताना झाली परिचारिका
मरणास ठरले प्लेग निमितमात्र…७

सुनंदा निकम
धुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here