
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – मूल : स्वातंत्र्याच्या नंतरही आदिवासी बांधव अजूनही सुधारलेला नाही त्याच्या जीवनात फारसा बदल झालेला नाही आदिवासींचे वास्तव विदारकच आहे आदिवासींचे प्रश्न अजूनही गंभीरच असल्याचे प्रतिपादन नाट्य कलावंत, झाडीपट्टीतील उत्कृष्ट नावाजलेले तबलावादक आणि झाडीपट्टीतील चंद्रकमल थिएटर्सचे अष्टपैलू कलावंत चिदानंद सिडाम यांनी केले.ते महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी येथे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई तर्फे गडचिरोली जिल्हा पहिले आदिवासी साहित्य संमेलनात बोलत होते. झाडीपट्टीतील नामवंत अष्टपैलू कलावंत,उत्कृष्ट तबलावादक आणि वक्ता म्हणून वनवैभव शिक्षण संस्थेचे अध्यक्षअब्दुल जमीर उर्फ बबलूभैय्या हकीम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मागील वीस ते बावीस वर्षापासून झाडीपट्टी नाटकांचा चिदानंद सिडाम यांचा प्रवास सुरू आहे. झाडीपट्टीतील दिग्गज कलावंत सिने देवेंद्र दोडके, डॉ. प्रा. शेखर डोंगरे, प्राचार्य के. आत्माराम यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत.अगदी लहानपणापासून म्हणजेच वयाच्या नवव्या वर्षापासून नाट्य कला आणि वादनाची आवड,कलापथक,नाटकामध्ये बालकलावंत यापासून सुरुवात करीत आज ते चरित्र अभिनेता, खलनायक, हिरो अशा अष्टपैलू भूमिका सादर करीत एक वेगळी ओळख झाडीपट्टीत निर्माण केली आहे. म्हणून त्यांना महात्मा फुले महाविद्यालय आष्टी जिल्हा गडचिरोली आयोजित दिनांक 23 व 24 डिसेंबर 2025 ला गडचिरोली जिल्हा पहिले आदिवासी साहित्य संमेलनात परिसंवाद आदिवासी जीवन वास्तव आणि नाटक या विषयावर वक्ता म्हणून आमंत्रित करून त्यांचा सत्कार सन्मान करण्यात आल. यामुळे निफंद्रा या गावची मान त्यांनी उंचावली आहे. यावेळेस विचार मंचावर संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनायक तुकाराम, राष्ट्रीय प्रबोधनकार – अनिरुद्ध वनकर, डॉ. शेखर डोंगरे प्रा. डॉ. राजकुमार मुसने आणि नाट्य कलावंत मुकेश गेडाम आणि प्रा.गायत्री खरवडे उपस्थित होते.















