prabodhini news logo
Home चंद्रपूर इंदिरानगरातील दूषित पाणीपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

इंदिरानगरातील दूषित पाणीपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

0
159

७ दिवसांत कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा – सुमित हस्तक

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – नंदोरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या इंदिरानगर परिसरात सोलर पंपाच्या माध्यमातून दोन सिन्टेक्स टाक्यांमधून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र मागील ८ ते ९ महिन्यांपासून या सिन्टेक्स टाक्यांची कोणतीही साफसफाई अथवा निर्जंतुकीकरण करण्यात आलेले नसून, सदर पाणी कोणत्याही प्रकारचे फिल्टर न करता थेट नागरिकांना पुरवले जात आहे.
या पाण्यामध्ये चिखल, कचरा व घाण आढळून येत असून लहान मुले, महिला व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनामध्ये संबंधित विभागाला ७ दिवसांच्या आत तातडीने कार्यवाही करून सिन्टेक्स टाक्यांची साफसफाई, निर्जंतुकीकरण व शुद्ध पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. ठरलेल्या कालावधीत कार्यवाही न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
हे निवेदन शिवसेना लोकसभा संघटक मुकेश भाऊ जीवतोडे, युवासेना महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य हर्षल भाऊ शिंदे व युवासेना जिल्हा प्रमुख आलेख भाऊ रट्टे यांच्या मार्गदर्शनात,
युवासेना लोकसभा सचिव सुरज भाऊ शाहा यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच
युवासेना जिल्हा संघटक सुमित भाऊ हस्तक यांच्या नेतृत्वात देण्यात आले.

नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी युवासेना भद्रावती तालुका संघटक निलेश उरकुळे, युवासेनेचे चंदु भाऊ मडावी,अक्षय नंदुरकर, गणेश ताजने, संजय भोयर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here