
आयुष्यात शिस्त हवी
त्या साठी वेळ पाळावी
कामे वेळे आधी उरकावी
अंगी सवय लावून घ्यावी
काम नाही झाले तर वेळेत
आपुले मन स्वास्थ बिघडत
चिड चीड बसावे करत
जाते आयुष्यात सारे चुकत
सवयिनी सार जात जमत
फक्त करावी लागते सुरवात
त्यामुळे जीवन जात आनंदात
वेळ कुणासाठी नाही थांबत
नवा संकल्प नवीन वर्षाचा
फायदा करून घ्या वेळेचा
जीवनाचा प्रवास होईल सुखाचा
हाच मूल मंत्र जपा आयुष्याचा
प्रतिभा सडेकर
वडगाव बेळगाव















