Home चंद्रपूर जनता विद्यालय दुर्गापूर येथे योग प्रशिक्षण संपन्न

जनता विद्यालय दुर्गापूर येथे योग प्रशिक्षण संपन्न

0
134

उज्वला नगराळे महिला जिल्हा संपादिका चंद्रपूर – दुर्गापूर : येथील जनता विद्यालय येथे १७ जानेवारी २०२६ रोजी विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी वैजयंती फिटनेस फाउंडेशनच्या वतीने विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका पोटे मॅडम आणि सहायक शिक्षक राजुरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.

योग शिक्षिका वैजयंती विकास गहूकर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी चक्रासन, हलासन, सर्वांगासन, सुप्तवज्रासन, उत्तान मंडूकासन आणि मच्छासन यांसारख्या कठीण आसनांची प्रात्यक्षिके करून दाखवली व त्यांचे आरोग्यासाठी होणारे फायदे समजावून सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवगीतांवर आधारित विशेष व्यायाम प्रकारांनी विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह भरला. फाउंडेशनच्या सहयोगी सदस्य अंजली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना पारंपारिक ‘लाठी-काठी’ कलेची माहिती देऊन स्वसंरक्षणाचे धडे दिले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका पोटे मॅडम यांनी वैजयंती गहूकर, विकास गहूकर आणि अंजली मेश्राम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या उपक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शाळेतील मुलांनी मोठ्या उत्साहात सर्व आसने आणि व्यायाम प्रकारांमध्ये सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here