prabodhini news logo
Home चंद्रपूर WCL गार्डन चंद्रपूर येथे विधवा महिलांचा हळदी कुंकू चा कार्यक्रम साजरा

WCL गार्डन चंद्रपूर येथे विधवा महिलांचा हळदी कुंकू चा कार्यक्रम साजरा

0
130

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : दिनांक 22/1/2026 रोजी WCL गार्डन, चंद्रपूर येथे विधवा महिलांचा हळदी कुंकू चा कार्यक्रम घेण्यात आला. इतर महिलांना जसा समाजात मान-सन्मान मिळतो तसाच मान-सन्मान विधवा महिलांना पण मिळाला पाहिजे.
प्रत्येक विधवा स्त्रीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. विधवा महिलांना हळद कुंकू लावून आणि अल्प उपहार देऊन घेण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन स्वाती नगराळे यांनी केले,अंजली मेश्राम यांनी जुन्या रूढी -परंपरा मोडून नवीन बदल समाजात कशा प्रकारे झाले पाहिजे याबद्दल माहिती दिली तसेच शोभा उराडे यांनी अंजली मेश्राम यांचा कार्याबद्दल महिलांना माहिती दिली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भावना कांबळे,संगीता तोडे, यशोदा तेलंग,अरुणा उराडे आणि महिला मंडळ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here