
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री. नागेश्वर विद्यालय मोशी भागशाळा चिखली ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी नवनिर्वाचित नगरसेवक विकास साने, विनायक आबा मोरे, ॲड.प्रकाशराव मोरे, जयवंत मोरे, साने मामा, विठ्ठल आबा मोरे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुरेश तात्या म्हेत्रे, साधना मळेकर , अंकुशराव मळेकर , संतोष मोरे, नितीन साळी , दत्तात्रय मोरे, केशव कुलथे, तुकाराम मोरे, गणेश मोरे, मच्छिंद्र मोरे, निर्मला बोराटे मॅडम. केशव कुलथे आदी मान्यवर उपस्थित होते.
सन्माननीय नगरसेवक विकास साने यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, घोषणा, संपूर्ण भारत साक्षर प्रतिज्ञा, घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ॲडव्होकेट प्रकाशराव मोरे यांनी भूषवले. सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत स्काऊट संचालन व संगीतमय कवायत प्रात्यक्षिक घेण्यात आले. विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ शामला पंडित मॅडम यांनी प्रास्ताविक केले . मुख्या . श्री सानप यांनी मनोगत व्यक्त केले .अर्पिता पाटील इयत्ता नववी ग विद्यार्थीनीने मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांच्या हस्ते इयत्ता दहावीचे विद्यार्थी व व्ही एस ग्रुप तर्फे घेण्यात आलेल्या निबंधलेखन व काव्यलेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. त्यानंतर विविध कला गुणदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. देशभक्तीपर गीत,भारुड, भजन ,रिमिक्स ,गाण्यावरील नृत्य अशा विविध प्रकारची नृत्य सादर करण्यात आली.
विद्यालयाच्या पर्यवेक्षिका शामला पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम नियोजनाप्रमाणे पार पाडला.















