
सावली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – भारतीय बौद्ध महासभा तथा बौद्ध समाज मंडळ भीमनगर (चकपिरंजी) तालुका सावली जिल्हा चंद्रपूर चे वतीने दिनांक १६/२/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता तथागत भगवान बुद्ध मूर्ती अनावरण सोहळा स्थळ – बुद्ध विहार भीमनगर (चकपिरंजी) येथे भंते नागसेन सुगत नगर नागपूर यांचे हस्ते तथागत भगवान बुद्ध मूर्ती अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
तरी जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, ग्राम पदाधिकारी तसेच सर्व बंधू भगिनी, उपासक उपासिका यांनी आवर्जुन उपस्थित रहावे असे आयु सुषमा वाळके, आयु श्रीदेवी तावाडे, आयु जया मेश्राम, आयु मंदा खोब्रागडे, आयु जास्वंदा वाळके, आयु लीना तावाडे, मनोज रामटेके, ईश्वर मेश्राम, नानाजी तावाडे बौद्ध समाज मंडळ भीमनगर (चकपिरंजी) यांनी कळविले आहे.















