
लातूर प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे – गेली अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय काम करणारा युवक विनोद कोल्हे यांची महाराष्ट्र राज्य संघटक पदी सर्वानुमते निवड मुंबई येथे झालेल्या बैठकित ही निवड करण्यात आली आहे भिम आर्मी चे संस्थापक तथा आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार चंद्रशेखर भाई आजाद भिम आर्मी चे राष्ट्रीय अध्यक्ष विनयरतन सिंह यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांचे हस्ते ही निवड करण्यात आली आहे विनोद कोल्हे हे शोषित पिडीत वंचित घटकांचा आवाज म्हणून ओळख असलेला समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देणारा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सवतःला झोकून देणारा आक्रमक चेहरा म्हणून सर्वत्र विनोद कोल्हे यांचीओळख आहे समाजासाठी दिवस रात्र संघर्ष करताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल असताना पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यासाठी सदैव पुढे असतो भिम आर्मी च्या माध्यमातून त्यांचे कार्य चालू आहे विनोद कोल्हे यांनी मराठवाडा संघटक ते. मराठवाडा अध्यक्ष म्हणून यांनी काम पाहिलेले होते मराठवाडा कमिटी बरखास्त झाल्यानंतर मुंबई येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र संघटक तथा अहील्यानगर, हिंगोली बीड, जिल्हा प्रभारी म्हणून संघटनेने याच्यावर जबाबदारी देवून यांची सर्वानुमते केली आहे योग्य व्यक्तीची योग्य ठिकाणी निवड करून त्याचा सन्मान केला त्यामुळे या निवडीमुळे समाजातून तसेच मित्र परिवारातून त्यांच्यावर अभिनंदन केले जात आहे.
या निवडीच्या वेळी महाराष्ट्र कोर कमिटी प्रमुख माननीय राजुजी झनके, महाराष्ट्र प्रमुख माननीय अशोकजी कांबळे, प्रदेश महासचिव दीपक भालेराव , प्रदेश उपाध्यक्ष संदीप शेलार, रमेश बालेशगोळ,प्रदेश सचिव सुनील गायकवाड , प्रदेश सचिव शंकर मुन,प्रदेश उपाध्यक्ष राहुल वाघ ,प्रदेश सचिव अक्षय धावारे आदी भीम आर्मीचे हजारो भीम आर्मीचे कार्यकर्ते होते.तसेच विनोद कोल्हे यांच्या निवडी बद्दल लातूर येथील भीम अर्मीच्या आनेक कार्यकर्त्यांनी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.















