prabodhini news logo
Home ठळक बातम्या वसुधा फाउंडेशन:जागतिक महिला दिनानिम्मित “ती ” चा सन्मान प्रमाणपत्र देऊन साजरा

वसुधा फाउंडेशन:जागतिक महिला दिनानिम्मित “ती ” चा सन्मान प्रमाणपत्र देऊन साजरा

0
70

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – वसुधा फाउंडेशन ची स्थापना होऊन आता दोन वर्षे पूर्ण होत आली. वसुधा फाउंडेशन हे नाव दिलेल आहे आणि त्या नावाला साजेस माझं काम चालूच आहे.
गेले 35 वर्ष मी शैक्षणिक सेवा केली. शिक्षण क्षेत्रात असताना वर्गातल्याच पाच-सहा मुलांना दत्तक घ्यायच आणि त्यांचा खर्च करायचा अशी मुलं घ्यायची की एखाद्याचे आई-वडील दोघेही नसतील किंवा एक सिंगल पेरेंट्स असतील किंवा खूप गरीब परिस्थिती असेल अशी मुलं आपल्या वर्गातील निवडायची आणि त्यांचा वर्षभराचा खर्च करायचा कारण माझे एवढा पगार नव्हता की मी सर्व मुलांचा खर्च करीन. मी माझ्या हातात काय मिळत होतं त्यातला दहा टक्के वाटा तरी मी ह्या मुलांसाठी खर्च करत असेल. अजूनही माझं हे काम चालूच आहे अनाथ आश्रम,वृद्धाश्रम, समाजातील तळागाळातील लोकांना साडी वाटप,ड्रेस वाटप, त्यांना बालगीत शिकवणे, बडबड गीते शिकवणे,काव्य संमेलनातून काव्य कसे करायचे हे पण आम्ही शिकवतो. त्याचबरोबर “रमाची पाटी” ही माझी शॉर्ट फिल्म सुद्धा आम्ही दाखवतो आणि त्यातून मुलांना काय घेण्यासारखे आहे हे त्यांचे शिक्षक उत्तम सांगतात.आणि मग मुलांकडूनच ऍक्टिव्हिटी कशा करून घ्यायच्या,काय, काय करता येते?शनिवार म्हणजे दप्तर मुक्त शाळा तर ह्या शनिवारी आपण कोण कोणते उपक्रम घेऊ शकतो हे सर्व वसुधा फाउंडेशनची टीम आम्ही सर्व मिळून हेच काम करत असतो.समाजसेवेचे व्रत हाती घेतले ते कधी सोडणार नाही.
हा समाज रुपी समाजसेवेचा लढा माझी मी एकटीच करत असते आता मात्र माझ्याकडे माझी वसुधा फाउंडेशनची टीम खंबीरपणे पाठशी उभी आहे त्यामध्ये कोमल, शीतल, श्रेया,योगेश, गौरव, तुषार, सायली,मयुरी,घडे सर, काकडे सर, प्रमोद ही नाव प्रामुख्याने मला घ्यावी वाटतात.
मला मधुसूदन घाणेकर सरांनी सुद्धा खूप मदत केलेली आहे कोणतेही कार्यक्रम घ्यायचे म्हणलं तर आम्ही सर्व मिळून पहिली चर्चा करत असतो.
प्रिया, सारिका,भारती, दीपा या सुद्धा माझ्या मैत्रिणी आहेत आणि वेळोवेळी आम्ही एकमेकांचा सल्ला घेऊन कार्य करत असतो.
*वसुधा फाउंडेशन* आपण समूह तयार केला परंतु या समूहात एक चार-पाच जण सोडले तर जास्त कोणीही सहभाग घेताना दिसत नाही स्पर्धा असेल तरच फक्त आपण सहभाग घेतो असे मला दिसून आले पण मी *ती* चा सन्मान करायचा असं माझ्या टीम तर्फे ठरवलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझ्यासमूहामध्ये अनेक वेगळ्या क्षेत्रातील महिला, असमान्य व्यक्तिमत्व असणाऱ्या महिला आहेत की ज्यांचा परिचय मला आत्तापर्यंत झालेलाच नव्हता तर या परिचय मागण्यामागे एकच मनात होतं की आपण आपल्या समूहात नेमकं कोण आहे आणि काय करतय हे तरी आपल्याला समजायला हवं तर आपण सर्वांनी मला जी उत्तम साथ दिली त्याबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानते आणि आपल्याला सन्मानपत्र आनंदाने बहाल करते. आपल्याला ते आवडले असेल असे मला वाटते तर याबद्दल कोणाला बोलायचे असेल तर निश्चित आपण बोलू शकता मनःपूर्वक धन्यवाद थँक्यू!
योगेशने मनापासून आपल्याला ही प्रमाणपत्र बनवुन दिली त्या बद्दल त्याचे मनःपूर्वक धन्यवाद नाही म्हणणार… पण खूप कौतुक करते..
जवळजवळ 200 प्रमाणपत्र आम्ही समूहात दिली.
जागतिक महिला दिन उत्तम साजरा झाला. वसुधाला सर्वांचे उत्तम अभिप्राय देखील आले. मनःपूर्वक धन्यवाद वसुधा फौंडेशन मधील सर्व कर्तृत्ववान महिलांना..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here