prabodhini news logo
Home अहेरी उदरनिर्वाहावर घाला; अहेरीत लाल झेंड्याखाली आंदोलनाची हाक

उदरनिर्वाहावर घाला; अहेरीत लाल झेंड्याखाली आंदोलनाची हाक

0
119

अहेरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – शहरातील दानशूर चौक तसेच उपजिल्हा रुग्णालय परिसरात प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता चहा, नाश्ता टपऱ्या ,फळ,चणे,शेंगदाणे विक्रते व इतर लहान व्यवसाय करणाऱ्या गरीब, बेरोजगार व कष्टकरी नागरिकांना अचानकपणे हटविण्यात आले. या कारवाईमुळे अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आला असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

या अन्यायकारक कारवाईविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) आता आक्रमक भूमिका घेणार असून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी लाल झेंड्याखाली तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्यायग्रस्त व्यावसायिकांनीही या लढ्याला पाठिंबा देत संघर्षात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.

या पार्श्वभूमीवर कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव, भाकपा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. यावेळी कॉ. सुरज जककुलवार, जिल्हा सदस्य, भाकपा उपस्थित होते.

गरीब कष्टकरी लोकांना कोणतीही पूर्वसूचना न देता हटवणे हा सरळसरळ अन्याय असून प्रशासनाने तात्काळ सर्व व्यावसायिकांना त्यांच्या मूळ जागेवर पुन्हा बसण्याची परवानगी द्यावी, तसेच झालेल्या आर्थिक नुकसानीची योग्य नुकसानभरपाई द्यावी आणि या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कडक कार्यवाही करावी; अन्यथा भाकपा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा कॉ. सचिन मोतकुरवार यांनी दिला.

भाकपाने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला असून, अन्यायग्रस्तांना न्याय न दिल्यास अहेरीत मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारले जाईल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here