
धूमधडाक्यात गावकऱ्यांनी चिमुकल्यांचे केले स्वागत
यवतमाळा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील झरी तालुक्यातील वेडद येथील नुकत्याच पार पडलेल्या नवोदय परीकक्षेत चार चीमुकल्यांनी उत्तम व भरघोस गुणांनी यश प्राप्त केले.कारणही तसेच आहे गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा कायम असल्याचे बोलले जात आहे.मागील वर्षी सुद्धा दोन व या वर्षी चार विद्यार्थी नवोदय परीक्षेत यश संपादन केले.म्हणजे वर्षानुवर्ष जोपासलेली परंपरा काम करत असताना दिसून येत आहे.पात्र विद्यार्थी १) पूरब गावंडे ९५% २)सानिया धोबे ९३.५०% ३) प्रतीक घुंगरुड ९१.२५% ४)सात्विक चौधरी ९१.२५% असे एकूण चार पात्र विद्यार्थ्यांना गुण मिळवून गावाचे नाव उंचावर नेण्याचे काम केले.
“विशेष म्हणजे त्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक हे विद्यार्थांना मार्गदर्शनच तसे करतात की जणू कोणताही विद्यार्थी परीक्षेत बसला की तो पास कसा होईल त्याला गुण कसे जास्त घेता येईल या कडे जास्त भर देऊन विद्यार्थांना संभोवतात.सध्या सर्वस स्तरावरून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे व तेथील पालकांचे कौतुक केले जात आहे.संपूर्ण श्रेय पेंदोर सरांना दिले जात आहे. व विद्यार्थ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा वेडद येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. तालुका शिक्षणाधिकारी खैरनार साहेब व मुख्याध्यापक,शिक्षक गावातील पालकवर्ग यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन विद्यार्थांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या व संपूर्ण गावात फिरून मिरवणूक काढण्यात आली.यावेळी संपूर्ण गावातील जनता उपस्थित होते.















