
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर – विदर्भ साहित्य संघाच्या अटीतटीच्या लढतीत चंद्रपूरचा कवी इरफान शेख निवडून येणे हे आपणासाठी आनंददायी घटना आहे.त्यांना आता चंद्रपूर,गडचिरोली जिल्ह्यातील साहित्यिकांची मोट बांधून सजग कार्य करायचे आहे.इरफान कवी तर आहेच पण तो मोठा संघटक,आयोजक आणि निवेदकही आहे, एकंदरीत इरफान हे एक आनंदाचे पानच आहे ” असे काव्यमय मार्मिक विवेचन कवी व प्रसिद्ध लेखक डॉ धनराज खानोरकरांनी केले.ते चंद्रपूरात युगचेतना ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेतर्फे कवी इरफानच्या सत्काराप्रसंगी अध्यक्षीय पदावरून बोलत होते.
विचारपीठावर समीक्षक, भाष्यकार डॉ.राजकुमार मुसणे,प्रवीण आडेकर,कवी नरेशकुमार बोरीकर,कवी अनिल पिट्टलवार, विलास मांडवकरजी,शंकर लोंढे, सुशांत भांडारकर,विकास वनकर, संस्थेच्या सचिव प्रा.धनश्री चिताडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त इरफान शेख यांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ,हार,ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांचे भाषणं झालीत.
प्रास्ताविक डॉ.राजकुमार मुसणे,संचालन नरेश बोरीकर तर आभार प्रा.धनश्री चिताडें यानी केले. कार्यक्रमाला विराट मुसणेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.















