prabodhini news logo
Home अहेरी श्रीराम नवमी निमित्त कंकडालवार परिवाराकडून महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन…!

श्रीराम नवमी निमित्त कंकडालवार परिवाराकडून महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन…!

0
78

आलापल्ली येथे श्रीराम नवमी कार्यक्रम उत्सहात संपन्न…

अहेरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : हिंदू धर्मात रामनवमी हा सण अत्यंत पवित्र आणि उत्साहात साजरा केला जातो.गुरुवार २६ मार्च २०२६ रोजी या मंगल दिनाचे औचित्य साधून प्रभु श्रीरामांच्या जीवनातून मिळणारे काही अमूल्य धडे आपण आपल्या आयुष्यात उतरवले पाहिजेत.प्रभु श्रीराम हे केवळ एक राजे नसून ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत.त्यांचे संपूर्ण जीवन मानवी मूल्यांचा,धर्माचा आणि आदर्शांचा एक चालता-बोलता ग्रंथ आहे.

श्रीराम नवमी हा दिवस हिंदू बांधवांना खूप मोठा उत्सव म्हणले जाते.बांधवांनी भगव्या’झेंडा प्रत्येक चौक व गल्ली गल्लीत बांधून उत्सहात साजरा केले जातो.डीजेच्या तलावावार राम गाणेला नाचत मिरवणूक व शोभायात्रा काढतात,तसेच प्रत्येक ग्रामीण व शहर भागातील हा दिवशी श्रीराम व सीतादेवीचा कल्याणमहोत्सव कार्यक्रमाही पार पडतात,कल्याणमहोत्सवेला ग्रामस्थांनी ना चुकता उपस्थित राहून भगवान श्रीराम व सीतादेवीची दर्शन घेतात.

काल श्रीराम नवमीच्या औचित्य साधून आलापल्ली येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक डॉ.अजय कंकडालवार व काँग्रेसचे नेत्या सौ.सोनालीताई कंकडालवार,काँग्रेस नेते हणमंतू मडावी यांनी श्रीराम चौक आलापल्ली येथे अयोध्यापती प्रभू श्रीरामाचे विधिवत पूजा-अर्चना करून दर्शन घेतले.

यावेळी दर्शन घेतांना गडचिरोली जिल्ह्यातील समस्त जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे अशी प्रभू श्रीरामचंद्र चरणी प्रार्थना केली.तसेच रामनवमी कार्यक्रम स्थळी कंकडालवार परिवाराकडून महाप्रसाद कार्यक्रमाची आयोजन करण्यात आलं होता.

या महाप्रसादाचे स्थानिक नागरिक व रामभक्त,भाविक मोठ्या संख्येने आस्वाद घेतले होते.यावेळी काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी समस्त जनतेला राम नवमीचा शुभेच्छा दिल्या.

रामनवमी कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच राम भक्त,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम भक्तिमय वातावरणात मोठ्या थाटात पार पडला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here