prabodhini news logo
Home चंद्रपूर चंद्रपुरात रामजन्मोत्सवाचा जल्लोष; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून शोभायात्रेचे अभूतपूर्व स्वागत

चंद्रपुरात रामजन्मोत्सवाचा जल्लोष; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून शोभायात्रेचे अभूतपूर्व स्वागत

0
122

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर:प्रभू श्रीरामचंद्रजींच्या जन्मोत्सवानिमित्त चंद्रपूर शहरात काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने संपूर्ण शहर राममय झाले होते. भक्ती आणि उत्साहाने न्हाऊन निघालेल्या या सोहळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शोभायात्रेचे अत्यंत जल्लोषात आणि भव्य स्वागत करण्यात आले.
या मंगलप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे आणि चंद्रपूर मनपाच्या स्थायी समिती सभापती मनस्वी संदीप गिऱ्हे यांनी उपस्थित राहून सर्व रामभक्तांचे पुष्पगुच्छ देऊन आणि अभिवादन करून मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी त्यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
दिग्गज नेत्यांची उपस्थिती:
शोभायात्रेच्या स्वागत सोहळ्याला चंद्रपूर मनपाचे उपमहापौर प्रशांत दानव, माजी जिल्हाप्रमुख सतीश भिवगडे, महानगरप्रमुख सुरेश पचारे, विधानसभा प्रमुख प्रमोद पाटील, नगरसेविका श्वेता लांडगे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
भक्तीचा महाकुंभ:
शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या या शोभायात्रेवर फुलांचा वर्षाव करत शिवसैनिकांनी ‘जय श्रीराम’ च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. “रामराज्य हीच आपल्या सर्वांची संकल्पना असून, या उत्सवाच्या निमित्ताने समाजात एकोपा आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे,” अशा भावना यावेळी जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व रामभक्तांना रामनवमीच्या मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here