prabodhini news logo
Home चंद्रपूर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम

0
85

समाजकल्याण विभागाच्या वतीने 8 ते 14 एप्रिलपर्यंत आयोजन

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर दि. 09 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त सामाजिक न्याय, समाजकल्याण विभागाच्या वतीने 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात 8 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन. 9 एप्रिल रोजी 1) सर्व शासकीय वसतिगृह, निवासी शाळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर तसेच सन 2026 हे वर्ष महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असल्याने चवदार तळे, महाड येथील सत्याग्रहासंबंधी व त्यानुषंगाने मानवी हक्कांचे महत्व प्रतिपादन करणे व्याख्यान, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा इत्यादींचे आयोजन. 2) संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त संत गाडगे महाराज यांच्या कार्याचे महत्व प्रतिपादन करणारे व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा यांचे आयोजन. 3) सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण चंद्रपूर कार्यालय तसेच सर्व शासकीय निवासी शाळा व शासकीय वसतिगृहे येथे कार्यालयीन स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन.

10 एप्रिल रोजी 1) समतादूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाटीकाद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत जनजागृती, 2) महिला मेळाव्याचे आयोजन 3) मार्जिन मनी योजनेअंतर्गत कार्यशाळा. 11 एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन. 12 एप्रिल रोजी संविधान जागर कार्यक्रम. 13 एप्रिल रोजी जेष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबीर व आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबीर तर 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि लाभार्थ्यांना लाभ अथवा प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here