prabodhini news logo
Home चंद्रपूर बाबुपेठ सिद्धार्थ नगर परिसरातील नाली दुरुस्ती व साफसफाईचा प्रश्न ऐरणीवर; स्नेहल नगराळे...

बाबुपेठ सिद्धार्थ नगर परिसरातील नाली दुरुस्ती व साफसफाईचा प्रश्न ऐरणीवर; स्नेहल नगराळे मांडल्या नगरसेवकांकडे समस्या

0
159

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर (बाबुपेठ): सिद्धार्थ नगर बायपास रोड, बाबुपेठ परिसरातील नाली दुरुस्ती, साफसफाई आणि सांडपाण्याच्या नियोजनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या स्नेहल नगराळे यांनी परिसरातील नागरिकांच्या वतीने स्थानिक नगरसेवक लहू मरसकोल्हे यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले.
सिद्धार्थ नगर परिसरात पावसाळ्यात परिस्थिती अत्यंत बिकट होते. नाल्यांची वेळेवर सफाई आणि दुरुस्ती होत नसल्याने पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरते. याचा सर्वाधिक त्रास लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना सहन करावा लागत आहे. अस्वच्छतेमुळे आजारांचे प्रमाण वाढण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या निवेदनाची दखल घेत नगरसेवक लहू मरसकोल्हे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. “परिसरातील सांडपाण्याची समस्या सोडवण्यासाठी आणि नाल्यांच्या दुरुस्तीसाठी लवकरात लवकर उपाययोजना केल्या जातील. नागरिकांना पावसाळ्यात त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
स्नेहल नगराळे यांनी या कामाचा पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले असून, प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here