prabodhini news logo
Home चंद्रपूर चंद्रपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

चंद्रपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

0
20

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अबशील ससूवल बौद्ध मंडळ, मही महिला मंडळ आणि संतोषा समाज बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाकाली बालारी सेमी इंग्लिश प्राथमिक शाळा येथे दि. 19 एप्रिल 2026 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. प्रज्ञाशील सहारे व कुमार गोगुलवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वरूपा चिन्नाबाबू कुमार होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शामदीय मेश्राम यांनी केले, तर सूत्रसंचालन हरेन्द्र चुनारकर यांनी केले. आभार प्रदर्शन शंकर चापडे यांनी मानले.
या रक्तदान शिबिरात डॉ. प्रज्ञाशील सहारे, डॉ. संदीप शेंडे, धम्मदीप मेनाम, खीर उमारे, नितेश मून, खजील भडके, सिद्धार्थ भैसारे, संघशील सहारे, अश्वशील कातकर, धम्मदीय बालकर, प्रज्वल तेले, शंकर चापडे, विक्रम बोरकर, प्रज्वल कातकर, अखिल चापडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक उमेश्वर आत्राम सर व शिक्षक भूषण बुरटे सर आदींनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाखा पोचूताई चापडे, ललिता दुर्ग, उजाला चापडे, आरटके वर्षा चुनापुर, बनमाला जामनकर, अर्चना चंद्रगीरवार, शोभा वाघमारे, अंजली तुकवार, लक्ष्मी अवनूर, दीक्षा कुमार, पुनीता गेडाम आदींनी परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे समाजात रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित झाले असून नागरिकांकडून कार्यक्रमाचे कौतुक करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here