
साहित्याच्या उद्यानात शब्द फुले उमलली
काट्यावर करून मात फुलेच फुले उधळली
साहित्याचा भव्य पसारा
सारस्वतांच्या दरबारात
काव्य सरिता वाहू लागल्या
भरभरूनी आसमंतात
कथा कादंबरी मधून नाट्य गंध दरवळला
आत्मकथा भाव कथेतून प्रवाहित झाला
बोचऱ्या शब्दांनी घायाळ मानवा केले
शब्द फुलांच्या मखमालीने मृदुल त्यांना केले
शब्दांच्या सामर्थ्याला जगी तोड नाही
घाव शस्त्रांचा मिटतो शब्दांचा नाही
आयुष्याच्या वाटेवर शब्दांनी मिळते नाते
शब्दचि होती वैरी शब्दाने, प्रेम जुळते
शब्द फुलांच्या कोमल कलिका शब्द फुले होती
शब्द कलिका मिळून शब्द गुच्छ होती
या मोहक जगतात नाते शब्द फुलांचे जुळते
शब्दांचे मोती माळून सुरेख माळ बनते
शब्दांची फूंकर हीच शब्द फुले असती
बोचणी शब्दांची हे काट्याचे रूतणे गणती
स्नेह रजजूनी शब्द फुलांचे जगणं सुलभ होते
शब्द फुलांच्या दरवळाने मन गंधित होते
शब्द सुमनाने सुजनांचे स्वागत होते
शब्द सुमना विना जीवन रिते होते
निर्मला.डी.बोरकर
नागपूर















