
मूर्तिजापूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – वंचित बहुजन आघाडी तालुका मूर्तिजापूरच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना दूरध्वनीवरून शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक भूमिका घेत सामूहिक वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
शिवाजी महाराज स्मारक, मूर्तिजापूर येथे झालेल्या या कार्यक्रमात ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पुरोगामी विचार आणि इतिहासाच्या चिकित्सक अभ्यासाच्या समर्थनार्थ उपस्थितांनी भूमिका मांडत आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.
या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष सुनील सरदार, भैय्यासाहेब तायडे, देवानंद जामणी, निलेश डाबेराव, योगिता ताई वानखडे, मोहन रोकडे, मंगेश गावंडे, निलेश वानखडे, नाना गावंडे, सुधीर खंडारे, हर्षदा डोंगरे, आनंदा खाडे, शेख अहमद, योगेश सोनोने, शुभम साउथकर, सचिन दिवनाले, पोलीस पाटील अमतवाला यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमातून वंचित बहुजन आघाडीने विचारांवरील हल्ल्यांना प्रतिवाद म्हणून वाचन चळवळ अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.















