prabodhini news logo
Home अकोला वृद्धाश्रमात श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांचा वाढदिवस साजरा

वृद्धाश्रमात श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांचा वाढदिवस साजरा

0
32

अमोल जगताप उपसंपादक प्रबोधिनी न्युज – वलगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राजघराण्यातील १३ वे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर (इंदौर) यांचा वाढदिवस वलगाव येथील श्री संत गाडगेबाबा वृद्धाश्रमात सामाजिक भावनेतून साजरा करण्यात आला. हा उपक्रम श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर जिल्हा नियोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत वाढदिवस साजरा करत त्यांना अल्पोपहार देण्यात आला. तसेच अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्या ऐतिहासिक व समाजोपयोगी कार्याची माहिती उपस्थित वृद्धांना देण्यात आली. यासोबतच श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांच्या आचार-विचारांबद्दल व त्यांच्या सामाजिक कार्याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.
वाढदिवसानिमित्त उपस्थितांनी गाडगेबाबांच्या चरणी प्रार्थना करत राजेंना उदंड आयुष्य लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त केली.
या कार्यक्रमास वृद्धाश्रमाचे अध्यक्ष कैलाश बोरसे, निखिल घुरडे, मनोज कचरे, प्रकाशराव बोबडे, शिवहरी बोकडे, शरद तालन, मंगेश डमके, अक्षय नवरे, अमित महात्मे, पूर्ण बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here