
निसर्गसौदर्य चैत्राचे पहाता असता
ग्रीष्मातील वणवा चोरपावली येतो
साऱ्या सृष्टीला होरपळून काढतो
सजीव सृष्टीचा जणू वणवा पेटवितो.||१||
जीवाची काहिली होते
जलसाठे शुष्क होती
मूक जीव सावलीत
थंड सहारा शोधती||२||
माणसाविना रस्ते पडती ओस
सहनशील ती धरणीमाता भेगाळते
मूक अश्रू गाळते उसासते
सोसते सूर्याचा असहाय्य दाह
जलधारांच्या वर्षावा स्वागते.||३||
तळपत्या उन्हात वेधीतो नजर गुलमोहोर
उभा ताठ मानेने व्रतस्थ योगीसम
त्याग धैर्याची देत शिकवण
दर्शन सुखकर आनंद धाम.||४||
धरणी मातेची आग सारी
हा जणू शोषून घेतो
लाल भडक फुलांतून
अंगार सारा बाहेर फुलतो.||५||
अक्षय्य तृतीया देणे वैशाखाचे
आध्यात्मिक प्रगती मानवाची
फुललेला हा गेलमोहोर आहे
साक्ष तपस्वी योगी तेजाची. ||६||
अंजली गरगटे
पुणे















