prabodhini news logo
Home आरोग्य राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचा इशारा; थकीत वेतन न मिळाल्यास बेमुदत कामबंद...

राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचा इशारा; थकीत वेतन न मिळाल्यास बेमुदत कामबंद आंदोलन

0
88

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – राजुरा : येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत कंत्राटी कामगारांनी थकीत वेतन व एरियर्स तात्काळ न मिळाल्यास बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राजुरा उपजिल्हा रुग्णालयात अभिजित इंटेलिजन्स सिक्युरिटी अँड लेबर सप्लायर, नागपूर मार्फत कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांचे मागील अनेक महिन्यांचे वेतन व थकीत एरियर्स अद्यापही मिळालेले नाहीत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या या कामगारांवर आर्थिक संकट ओढवले असून, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

कंत्राटी कामगार तसेच झाशी राणी सांस्कृतिक मंडळ, बल्लारपूर चे अध्यक्ष श्री. रोहन कळसकर यांनी प्रशासनाला कडक इशारा देत म्हटले आहे की, “येत्या तीन दिवसांत सर्व कामगारांचे थकीत वेतन व एरियर्स अदा न झाल्यास, १ मे २०२६ पासून उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कंत्राटी कामगार बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करतील.”

रुग्णालयात स्वच्छता कर्मचारी, वॉर्डबॉय, नर्सिंग स्टाफ आदी विविध पदांवर कार्यरत असलेले हे कामगार अल्प मानधनावर रात्रंदिवस सेवा बजावत आहेत. मात्र, वेळेवर वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांसमोर गंभीर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

दरम्यान, संभाव्य आंदोलनामुळे रुग्णसेवेवर विपरीत परिणाम झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन व संबंधित कंत्राटदारावर राहील, असा इशाराही कळसकर यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here