prabodhini news logo
Home ठळक बातम्या मीरा-भाईंदरमध्ये धक्कादायक घटना : ‘कलमा’वाचण्यास नकार दिल्याने सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला; आरोपी...

मीरा-भाईंदरमध्ये धक्कादायक घटना : ‘कलमा’वाचण्यास नकार दिल्याने सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला; आरोपी अटकेत

0
49

मीरा-भाईंदर – मीरा रोड परिसरातील नया नगर भागात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका व्यक्तीने बांधकाम साईटवरील दोन सुरक्षा रक्षकांवर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने सुरुवातीला संबंधित रक्षकांना त्यांचा धर्म विचारला आणि त्यानंतर त्यांना ‘कलमा’ वाचण्यास सांगितले. त्यांनी तसे करण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात दोघांवर चाकूने वार केले. या हल्ल्यात दोन्ही रक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमी सुरक्षा रक्षकांची ओळख सुब्रतो सेन आणि राजकुमार मिश्रा अशी झाली आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला तात्काळ अटक केली. आरोपीचे नाव जैब जुबेर अन्सारी (वय ३१) असे असून तो कुल्ला परिसरातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांकडून आरोपीची सखोल चौकशी सुरू असून त्याच्या पार्श्वभूमीचा तपास केला जात आहे. या घटनेनंतर मीरा-भाईंदर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

*मोजीस परमार*
*विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे*
*प्रबोधिनी न्यूज नेटवर्क*
📞 *8104170564*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here