
कायदा व सुव्यवस्थेसाठी कलम 163 अन्वये आदेश पारीत
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर – दि. 29 : नॅशनल इलिजिबिलीटी कम एन्टरन्स टेस्ट (नीट) परीक्षा 3 मे 2026 रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील 10 केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. सदर केंद्राच्या ठिकाणी परिक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून 3 मे रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंध लागू करण्यात आले आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता2023 चे कलम 163 अन्वये जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहे.
नीट (युजी) या परिक्षा केंद्राच्या ठिकाणी 100 मीटर परिसरात दुपारी 12 ते सायं 6 वाजेपर्यंत परिक्षार्थी व्यतिरिक्त् 2 किंवा त्यापेक्षाअधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाहीत. परिक्षा केंद्राच्या ठिकाणी 100 मीटर परिसरांतर्गत दुपारी 12 ते सायं 6 वाजेपर्यंत नियमित व रोजच्या वाहतूकी व्यतिरिक्त इतर हालचालीना प्रतिबंध राहील. सदर परिसरात परिक्षेदरम्यान झेरॉक्स, फॅक्स, एस.टी.डी. बुथ, पेजर, मोबाईल फोन, ई-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणत्याही कॉम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील,
ही आहेत जिल्ह्यातील परिक्षा केंद्रे : 1) भवानजीभाई सी.एच. ज्यूनीयर कॉलेज, मूल रोड चंद्रपूर 2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ, आर्ट, कॉमर्स, साईन्स दीक्षा भुमी, चंद्रपूर 3) गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बायपास रोड, चंद्रपूर 4) केन्द्रीय विद्यालय, डब्लू, सी. एल दुर्गापुर 5) मातोश्री माध्य व उच्च माध्यमिक शाळा, तुकुम, चंद्रपूर 6) पी.एम.श्री. के. वी.ओ.एफ चांदा, भद्रावती, 7) आर. ए. किडवाई कॉलेज घुटकाळा वार्ड, चंद्रपूर 8) सैनिक स्कुल चंद्रपूर, 9) सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर, 10) झेड पी. जुबली हॉय स्कूल, चंद्रपूर.
सदर आदेशाचे उल्लघंन केल्यास संबंधित व्यक्ती वा इसम प्रचलित कायद्यातील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमुद आहे.















